सामाजिक कार्यकर्त्या महिलेचे खाजगी फोटो फेसबुकवर केले व्हायरल; 'जय ओबीसी' पेज गोत्यात


अहिल्यानगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या महिलेची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात जय ओबीसी या फेसबुक फेज सह हर्षवर्धन बारवकर या फेसबुक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३५ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय खेमनर यांनी संमतीने काढलेले खाजगी फोटो  'जय ओबीसी' या फेसबुक पेजवर आणि हर्षवर्धन बारवकर याच्या खात्यावरून अनधिकृतपणे प्रसारित करण्यात आले. २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत ची माहिती मिळाल्यावर पिडीत महिलेने २ एप्रिल रोजी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय खेमनर यांनी परस्पर संमतीने काही फोटो (सेल्फी) काढलेले होते. सदरचे खाजगी फोटो  या फेसबुक पेजेस आणि खात्यावरून अनधिकृतपणे प्रसारित करून त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे. आपली बदनामी करण्याच्या आणि एकांतपणाचा भंग करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी 'जय ओबीसी' (Jay Obc) नावाचे फेसबुक पेज आणि हर्षवर्धन बारवकर या फेसबुक खातेधारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७७ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ () नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे स्वतः करत आहेत.

 हे ही वाचा ... 

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर कमाईही ठरला धुरंधर, जगभरात कमावले 'इतके' कोटी

 


 

0/Post a Comment/Comments