केडगावमध्ये नगर - पुणे रोड लगतचे टायर दुकान चोरट्यांनी फोडले, रोकड लंपास

 


अहिल्यानगर - नगर-पुणे रस्त्यावर केडगाव परिसरात असलेले 'बालाजी टायर्स' हे दुकान अज्ञात चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून फोडल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या काउंटरमधील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन दादाभाऊ कोतकर (वय ४०, रा. गणेश अपार्टमेंट, एकनाथनगर, केडगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतकर यांचे रंगोली चौकात टायर्स विक्रीचे दुकान आहे. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांनी दुकान उघडले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे कशाच्या तरी साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील काउंटरचे ड्रॉवर तोडून त्यामध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड (१०० रुपयांच्या ५०० नोटा) लंपास केली. दुकानातील इतर सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कोतकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम ३०५ (), ३३१ (), ३३१ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

 हे ही वाचा ... 

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर कमाईही ठरला धुरंधर, जगभरात कमावले 'इतके' कोटी


 

0/Post a Comment/Comments