अहिल्यानगर
- नगर – जामखेड रोडवर सारोळा बद्धी
(ता.नगर) शिवारात भरधाव बोलेरो कॅम्पर वाहनाने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक
देऊन केलेल्या भीषण अपघातात एका सहप्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची
दुर्देवी घटना घडली आहे. या
अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी नगर
तालुका पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या
अपघातात सौरभ जितेंद्र भळगट (वय ३० वर्षे, रा. जीत
बंगला, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) यांना
गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच वाहनातील इतर प्रवासी ऐश्वर्या मोरे व प्रसन्न डांगे हे दोघेही गंभीर
जखमी झाले असून, बोलेरो गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या
माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी
रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आरोपी चालक शौनिक
रविंद्र खरडे (रा. झोपडी वॅन्टींग, अहिल्यानगर) हा त्याच्या
ताब्यातील बोलेरो कॅम्पर वाहन (क्र.एम एच १६ सीडी२७६०) भरधाव वेगात चालवून घेऊन
जात होता. त्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकाला
(डिव्हायडरला) जोरदार धडकवून भीषण अपघात केला. त्यामुळे
एकाचा जीव गेला तर दोघे जखमी झाले.
या
प्रकरणी डॉ. ट्विकल दिनेश खंडेलवाल (वय ३०, रा. आनंद
कॉलनी, गुलमोहर रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका
पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment