पारनेर
(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पारनेर तालुक्याचे
माजी अध्यक्ष विक्रमसिंह बबनराव कळमकर यांच्याविरोधात एका ३३ वर्षीय महिलेने
लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून लग्नाचे
आमिष दाखविले, त्यानंतर
इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल
करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी १० नोव्हेंबर २०२६ रोजी
संबंधित महिलेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे पारनेर
तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडे
दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित
महिलेची आरोपीशी सप्टेंबर २०२४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्यानंतर दोघांमध्ये मेसेजद्वारे संवाद सुरू झाला.
महिलेने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टोरीचे कौतुक करीत आरोपीने तिच्याशी संपर्क
वाढविला. पुढे मोबाईलवरही दोघांचे बोलणे सुरू झाले आणि या मैत्रीचे प्रेमसंबंधात
रूपांतर झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नोव्हेंबर
२०२४ मध्ये आरोपीने महिलेला कान्हूर पठार येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर
आपल्या चारचाकी वाहनातून तिला आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे नेले. तेथे एका लॉजवर खोली घेण्यात आली. महिलेने आधारकार्ड
नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने पत्नीचे आधारकार्ड वापरून लॉजची खोली घेतल्याचे
फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र,
महिलेने लग्नास नकार दिल्यानंतरही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने
शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या
घटनेनंतर आरोपी वारंवार फोन करून महिलेला भेटण्यासाठी आणि बाहेर फिरायला
जाण्यासाठी आग्रह करीत होता. आळेफाटा येथील लॉजवर असताना मोबाईलमध्ये काढलेले फोटो
आपल्याकडे असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत असल्याचे
महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
२०२५
मध्येही आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेला आळेफाटा येथील लॉजवर नेले आणि तिच्या
इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर खासगी फोटो व्हायरल
करण्याची धमकी देत आरोपीने महिलेला पुन्हा कान्हूर पठार येथे बोलावले. तेथून एमएच
१६ डीडब्ल्यू ०६३० क्रमांकाच्या वाहनातून जबरदस्तीने बसवून टाकळी ढोकेश्वर
परिसरातील कर्जुले हर्या येथील लॉजवर नेले. तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक
संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी विक्रमसिंह कळमकर हे राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पारनेर तालुक्याचे माजी अध्यक्ष असल्याने या
प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. एका माजी तालुकाध्यक्षाविरोधात
महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली
आहे. या प्रकरणातील महिलेने केलेले आरोप हे फिर्यादीतील कथन असून त्यांची सत्यता
पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
कळमकर
यांची तालुकाध्यक्षपदावरून हकालपट्टी
पीडित
महिलेने पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे विक्रमसिंह कळमकर यांच्याविरोधात
तक्रार केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर
तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने
केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, अशा
घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा महिला
अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर आमदार दाते यांनी तडकाफडकी विक्रमसिंह कळमकर
यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदावरून उचल बांगडी करत नवीन तालुकाध्यक्ष म्हणून डॉ.
वसंत चेडे यांची नेमणूक केली.
विक्रम
कळमकर यांच्यावर हनी ट्रॅप! महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी पदाधिकारी विक्रम सिंह कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल
करणाऱ्या महिलेने कळमकर यांच्याकडून ३१ लाख रोखीने तर २० लाख नोटरी करून रोख घेतले
व आणखी ५० लाखाची मागणी केली असल्याची फिर्याद कळमकर यांची पत्नी सोनाली
यांनी सुपा पोलीस ठाणे दाखल केले आहे. त्यानुसार सदर महिलेचा अन्य एक अनोळखी महिला
व पुरुष यांच्या विरोधात आणि हनी ट्रॅप सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. यामुळे सदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
याबाबत सोनाली कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती समाजसेवा व राजकीय क्षेत्रात काम करतात. माझे पती अलिकडच्या काळात मला प्रचंड माणसिक तणावात असल्याचे जाणवले. तेंव्हा मी मे/2026 महिन्याच्या कालावधीत माझे पती यांना विश्वासात घेवून विचारणा केली व तणावाचे कारण विचारले तेंव्हा त्यांनी पिंकसिटी केडगाव जि. अहिल्यानगर, येथील एका महिलेशी माझी 2024 मध्ये फेसबुकवर ओळख होवुन तिने दिड वर्षापासून मला प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्याकडून मोठ्या प्रमाणात वांरवार रोखीने व ऑनलाईन स्वरुपात अंदाजे तीस लाख ( 30,00,000/-) रुपये पैक्षा जास्तच उकळले असुन तिने आमच्या एकत्रित संबंधाचे चित्रीकरण, ध्वनी क्लिप व फोटो प्रसारीत करण्याची, माझे राजकीय करिअर व सामाजिक प्रतिष्ठा उध्वस्त करण्याची व माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची सतत धमकी देत असल्याचे सांगितले.
साधारण जुन/ 2026 चे सुरवातीस सदर महिला
तिचे स्कूटी गाडीवरून आमच्या राहत्या घरी आली व माझ्या घरातील माणसांच्या समक्ष
माझ्या पतीला पन्नास लाख (50,00000/-) रुपये देण्याची मागणी केली व पैसे दिले नाहीत तर मी
तुझ्यावर गुन्हा दाखल करीन, सोशल मिडीयावर आपल्या एकत्रित संबंधाचे व्हीडीओ, फोटो व्हायरल करीन असे
सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Post a Comment