'सैराट' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटाची सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा आहे. रिंकू चा अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत असतानाच ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रिंकू लग्न कधी करणार तिचा बॉयफ्रेंड कोण याकडे चहात्यांचं विशेष लक्ष असतं. ती अनेकदा मुलाखतींमध्ये बोलताना तिला कसा नवरा हवाय याविषयी बोलली आहे. पण पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना 'मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही.. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला...' असं म्हणताना दिसली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान रिंकू राजगुरुचे नाव अभिनेता आकाश ठोसर सोबतही जोडलं गेलं. नंतर कृष्णाराज महाडिक यांच्याबरोबरचा एक फोटो समोर आला होता त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल चर्चा झाली. मात्र दोघांमध्ये केवळ मैत्री असल्याचा समोर झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते ते प्रेक्षकांना आवडतातही. रिंकूच्या नव्या भूमिकांचं विशेष कौतुक होत असताना तिच्या एका वाक्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.
मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही..
रिंकू भाडीपाच्या एका शो मध्ये प्रमोशनसाठी गेलेली. यात समोर बसलेले तीन जण तिला बोलत असतात. हा एक मजेशीर शो आहे. पण रिंकू तिच्या स्टाईलमध्ये त्यांना म्हणते, माझे डोळे खूप खतरनाक आहेत. डोळ्यात बघू नकोस, प्रेमात पडशील. भल्या भल्यांची वाट लागलीय.ती पुढे सांगते, 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या सेटवर मी अभिनय पण करायचे, स्वयंपाकपण करायचे.. मी सेटवर सगळ्यांना जेऊ घातलय.त्यामुळे मी अत्यंत गुणी आहे. मी सेटवर पडले पण आहे. मी खूप धडपडी आहे. असा मजेशीर संवाद यात होताना दिसतो.
यात ती पुढे म्हणताना दिसते. 'मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला.' मुळात या शोचा format असा होता की आधी तीन जण प्रत्येक कलाकाराकडून सेटवरचे किस्से ऐकणार, त्यांना प्रश्न विचारणार, गप्पा मारणार आणि शेवटी यातील खोटी वाक्य कोणती होती हे सांगणार. त्यामुळे यात रिंकू किती खरं बोललीय हे तिलाच माहिती. पण, यापूर्वीही रिंकूने तिला कसा नवरा हवाय याविषयी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बोललेली दिसते.

Post a Comment