शेतातील बांधाच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी गजाने मारहाण, नगर तालुक्यातील घटना

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतजमिनीच्या बांधावरील मातीची भिंत (ताल) फोडल्याचा जाब विचारल्याने एका शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला लोखंडी गजाने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना कौडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौडगाव परिसरातील भिमा मारूती खोमणे आणि आरोपी युवराज करजुले यांची शेतजमीन एकमेकांच्या शेजारी आहे. आरोपीने आपली जमीन विकत घेतलेली असून, तो येण्या-जाण्यासाठी फिर्यादीच्या शेतातील रस्ता वापरतो. दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या शेतातील बांधाची ताल फोडल्याने वाद निर्माण झाला होता. खोमणे यांनी आरोपीला "ही ताल पुन्हा नीट करून द्या किंवा त्याचे पैसे द्या," अशी विनंती केली. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात आरोपीने जवळच असलेला लोखंडी गज उचलून खोमणे यांच्या पायावर, मांडीवर आणि गुडघ्यावर जोरात प्रहार केले. पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी धावून आली असता, आरोपीने त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून चपलेने मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस हवालदार शैलेश सरोदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा ...

"फुला" चित्रपटात उलगडणार वाघ्या-मुरळीचं जग, काय आहे कथा... 



0/Post a Comment/Comments