अहिल्यानगर - नगरच्या बाजार समितीत सध्या दररोज १२०० ते १५०० क्विटल चिंचेची आवक येत आहे. चिंचेला प्रतवारीनुसार १०५०० ते २७,४०० रुपये प्रति क्विंटल लिलावात उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी व बागवान यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून १४ मार्च रोजी पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
तसेच अख्खी चिंच प्रतवारी नुसार २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल, बोटुक ४८०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल, चिंचोका २८०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल, बाजारभाव मिळालेला आहे. १४ मार्च रोजी नेमिचंद रुपचंद फिरोदीया या आडतीवर १० बॉक्स चिंचेस २७४०० रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळालेला आहे. चिंच लिलाव मध्ये मे. सार्थक भगवानदास अॅन्ड कंपणी, मे. श्रीकांत चंगेडीया, मे. भारती ट्रेडर्स व मे. नवनितमल श्रीमल चंगेडीया हे चिंच खरेदीदार आहेत. लिलाव पद्धतीमुळे चिंचेस योग्य बाजार भाव मिळत असल्याने चिंच विक्रीला कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरला शेतकरी पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी बांधवानी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ व संचालक मंडळ तसेच सचिव अभय भिसे यांनी केले आहे. चिंच लिलाव प्रक्रीयेकरीता विभाग प्रमुख प्रदिप गजरे, संदीप जाधव व संतोष क्षिरसागर यांनी कामकाज पाहिले.
हे ही वाचा ...
सावधान! तुमच्या मोबाईलवर आलेला 'हा' व्हिडीओ खरा की खोटा?
'या' अभिनेत्रीचा ४ वर्षांचा संसार मोडला!, पतीकडे किती मागितली पोटगी?

Post a Comment