टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन



मुंबई - रविवारी 8 मार्च 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप सामना पार पडला, त्यामध्ये भारत टीमने ऐतिहासिक विजय मिळवून प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचावली आहे. भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून टी20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली. देशातील जनतेसह, भारतीय सेलिब्रिटी देखील या विजयामुळे अत्यानंदीत झाले आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी सामना संपण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी उत्साहात "बुमराह बुमराह" असे ओरडले. त्यांनी त्यांच्या लॅपटॉप स्क्रीनवर भारतीय संघ क्रिकेट खेळत असल्याचे दाखवले आणि नंतर कॅप्शनमध्ये "बुमराह" असे लिहिले.
अक्षय कुमारपासून ते अजय देवगणपर्यंत सर्वांनी आनंदात डान्स केला. अक्षय कुमारने नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, "प्रत्येक घरात उत्सवाचे वातावरण आहे. कप घरी आणल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन." अजय देवगणने लिहिले, "जोरात ओरडल्यामुळे माझा घसा दुखत आहे, पण माझे हे हसू आठवडाभर राहील! #TeamIndia, आज रात्री तुम्ही अभिमानाने अब्जावधी मनं फुलवली आहे! पुन्हा एकदा चॅम्पियन्स!"
सोनू सूदने लिहिले, "स्कोअरबोर्ड काहीही म्हणो... माझे मन आधीच आनंद साजरा करत आहे. टीम इंडियाचे अभिनंदन, पुन्हा एकदा चॅम्पियन!"
सनी देओलने भारताचे अभिनंदन केले आणि लिहिले, "टीम इंडियाच्या गब्रू!!! तुम्ही जिंकलाच!! #चॅम्पियन्स, तुम्ही हिंदुस्थानला अभिमान दिलात!! सलग दोन वर्ल्डकप जिंकल्याबद्दल #टीमइंडियाचे अभिनंदन, तुम्ही खरोखर गब्रूसारखे खेळलात- निर्भय, उत्साहाने!"
आयुष्मान खुरानाची पोस्ट चर्चेत

अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या भावासोबत एक संस्मरणीय क्षण अनुभवला. टीव्हीवर सामना पाहताना स्टेडियममधील प्रेक्षकांमध्ये त्याचा भाऊ अपारशक्ती खुरानाला पाहून आयुष्मानने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. भारताने सामना जिंकल्यानंतर त्याने पोस्ट केले, "अहमदाबादचा शाप तुटला आहे! पात्र विजेत्यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे! टी20 विश्वचषक जिंकणारे तिन्ही कर्णधार आज उपस्थित आहेत: एमएसडी, रो आणि स्काय!"

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध विजय

टी-20 वर्ल्डकप सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. 2007, 2016 आणि 2021 यांसह या सामन्यांत न्यूझीलंडने कधीही भारताकडून पराभव पत्करलेला नव्हता. पण या वर्षाच्या सुरुवातीला ब्लॅक कॅप्सविरुद्ध घरच्या मैदानावर 4-1 अशी टी-20 सीरिज जिंकल्यानंतर भारताने आत्मविश्वासाने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि घरच्या मैदानावर चषक जिंकला.


 

0/Post a Comment/Comments