माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधात न्यायालयाचे स्टँडिंग वारंट

 


अहिल्यानगर - माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरोधात जिल्हा न्यायालयाने स्टैंडिंग वॉरंट बजावल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने हा आदेश दिला असून, कळमकर याला अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

त्याच्याविरूध्द २१ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ हे करीत होते. पुढे हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी विविध पथके तयार करून कळमकरचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत असून, तांत्रिक तपासाचाही आधार घेतला जात आहे. तरीही तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. न्यायालयाने बजावलेल्या स्टैंडिंग वॉरंटनुसार, संबंधित संशयित आरोपी कुठेही आढळल्यास तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कळमकर याच्या अटकेसाठी आता कायदेशीर दबाव अधिक वाढला आहे.


 

0/Post a Comment/Comments