दिल्ली - सोने-चांदीच्या दरांमध्ये मागील आठवड्यात तेजी पाहायला मिळाली असली तरी सध्या दरात मोठी घसरण (Gold-Silver Price) पाहायला मिळत आहे. विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती ऑल टाइम हायच्या तुलनेत तब्बल १.९६ लाख रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या किमतीतही मोठी घट नोंदवली गेली आहे.(Gold-Silver Price)
आज (१३ एप्रिल)च्या ताज्या दरांनुसार, चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर २४ कॅरेट सोने १,५२,८३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
१३ एप्रिलच्या ताज्या दरांनुसार, चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर २४ कॅरेट सोने १,५२,८३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे. उल्लेखनीय म्हणजे, याच वर्षी २९ जानेवारी रोजी सोने-चांदीने उच्चांकी पातळी गाठली होती.
Gold-Silver Price : हाय लेव्हल विरुद्ध सध्याचा दर
चांदी (प्रति किलो)
हाय लेव्हल – ४,२५,००० रुपये
सध्याचा दर – २,५९,९०० रुपये
घसरण – १,९६,००० रुपये
सोने (प्रति १० ग्रॅम)
हाय लेव्हल – १,९०,००० रुपये
सध्याचा दर – १,५२,८३० रुपये
घसरण – सुमारे ५०,००० रुपये
आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५२,८३० रुपये
२२ कॅरेट – १,४०,०९० रुपये
१८ कॅरेट – १,१४,६२० रुपये
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरमधील चढ-उतार आणि मागणी-पुरवठ्यावर सोने-चांदीच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदीपूर्वी बाजाराचा कल लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच किरकोळ बाजारात जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळे अंतिम किंमत अधिक असू शकते.

Post a Comment