पारनेर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई


 
अहिल्यानगर - अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात व पुणे जिल्हयात दरोडा टाकुन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पारनेर तालुक्यातील करंदी येथील वस्तीवर दरोडा टाकुन सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेणारी टोळी मधील टोळी प्रमुख विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (रा. माजमपुर,ता.पारनेर) व टोळी सदस्य  पंकज नरेश काळे, सचिन नरेश काळे, प्रविण नरेश काळे, गिरीष आलम काळे (रा. निघोज,ता. पारनेर), संदीप उर्फ गोटया विठ्ठल मैड, (रा. जवळा, ता.पारनेर) यांनी  अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर, पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरुर, आळेफाटा, मंचर पोलीस स्टेशन हद्दीत गैर कायदयाची मंडळी जमवुन संघटीतपणे घातक शस्त्रासह व बळाचा वापर करुन जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, चोरी करणे, घरफोडी चोरी, करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणे, असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे करुन दहशत निर्माण केली होती. 

नमुद आरोपींविरुध्द पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्फत प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची व कागदपत्रांची बारकाईने छाननी करुन सदरचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक कार्यालयाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी सादर केला होता.  

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांनी वरील आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1)(ii),3(2),3(4) ही वाढीव कलमे लावण्याची मंजुरी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नगर ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने हे करत आहेत.  

भविष्यात अहिल्यानगर जिल्हयात गंभीर स्वरुपाचेगुन्हे करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


 

0/Post a Comment/Comments