भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, घाटात बस थेट खड्ड्यात कोसळली


जामखेड - औढा नागनाथ वरून जेजुरी पुण्याकडे जात असलेल्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल बसला जामखेड तालुक्यातील साकत घाटात २७ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून इतर १८ ते २० जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मध्यप्रदेश येथील बऱ्हाणपूर येथून काही भाविक मिनी ट्रॅव्हल भाड्याने करून  मुक्ताईनगर, शेगाव, औढा नागनाथ, तुळजापूर करून जेजुरी पुण्याकडे चालले होते. रात्री दोन च्या आसपास घाटात एका गाडीला ओव्हरटेक करून वळणाचा अंदाज न आल्याने गाडी संरक्षक कठडा व दिशादर्शक फलकाला धडक देऊन सरळ खाली खड्ड्यात पडली यात चौघे गंभीर जखमी झाले आहेत तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत.

यावेळी एकच हाहाकार उडाला, कोणाच्या हाताला जखम, कोणाच्या पायाला जखम, कोणाचे डोके फुटले, कोणाचा हात तर कोणाचा पाय मोडला. रात्री अंधारात अपघातग्रस्तांचा आरडाओरडा सुरू होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुसर्‍या गाड्या थांबून सर्व जखमींना समोरून बाहेर काढले रूग्णवाहिकेस फोन करून जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यातील वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन व ड्रायव्हर गौरव महाजन हे चार जण जखमी झाले. यांच्यावर प्राथमिक उपचार करून नगरला पाठविले आहे सध्या ते नगर येथे उपचार घेत आहेत यातील वंदना व योगिता यांना पुणे येथे हातापायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवले अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. काही प्रवासी तर काचेतून बाहेर पडले. अपघातातील अनेकांना मुका मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.

साकत घाटात नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे वळणे कमी करून रस्ता रूंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 


 

0/Post a Comment/Comments