केडगाव बायपास रोडवर गावठी कट्ट्याचा थरार...पोलिसांची मोठी कारवाई


अहिल्यानगर - गावठी कट्टा जवळ बाळगुन दहशत करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. केडगाव बायपास रोडवर २० मे रोजी रात्री ८.४८ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहबाज निसार शेख (वय ३४, रा. रहेमतनगर, जोर्वेनाका संगमनेर, मुळ रा. एच डी एफ सी बँकेशेजारी, सोनई, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव असून त्याच्या कडून गावठी कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा ताब्यात घेवुन संशयित रित्या केडगाव बायपास रोडवर अनुराज टायर्स समोरील बाजुस आला आहे. ही माहिती मिळताच पो.नि. गायकवाड यांनी तात्काळ पोलीस पथक कारवाई साठी पाठविले. या पथकाने त्या ठिकाणी जावून संशयित आरोपी शहबाज शेख यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे ८० हजार रुपये किंमतीचे अग्नीशस्त्र व ३ हजार रुपये किंमतीचे 3 जिवंत काडतुस असा मुददेमाल मिळुन आला आहे. त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द पो.कॉ.सुरज कदम यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक  प्रविण पाटील, पोलिस अंमलदार राहूल शिंदे, दळवी, बोरगे, दौड, साबीर शेख, विजय ठोंबरे, सुरज कदम, दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, रमेश शिंदे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, अमोल गाडे, अतुल लाटे, अतुल काजळे, शिरीष तरटे, गंगाधर आंग्रे, किरण बडे, म.पो.कॉ.पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.


 

0/Post a Comment/Comments