नगरमध्ये 'स्पा सेंटर'च्या नावाखाली सुरु होता भलताच ‘कुटाणा’, पोलिसांची मोठी कारवाई


अहिल्यानगर -नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या 'अँक्यूम मसाज पार्लर/स्पा सेंटर'वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयु) छापा टाकून वेश्याव्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. 'स्पा' सेंटरच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अनिकेत अशोक बचाटे (वय २७, रा. जिनती, कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), संतोष गणेश बघे (रा. छत्रपती संभाजी नगर), काळूराम भीमा समिंदर (रा.मांडवगण फराटा, ता.शिरूर), सजन एस (रा.केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

२७ मे रोजी रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मनमाड रस्त्यावरील अँक्यूम स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईची योजना आखली. दोन सरकारी पंचांना सोबत घेऊन बनावट ग्राहक तयार करण्यात आला आणि त्याला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले.  

बनावट ग्राहकाने खात्री करून माहिती दिल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. यावेळी तेथे ५ रूम आढळून आल्या व त्यामध्ये ४ महिला आढळल्या. या ठिकाणाहून पथकाने रोख रक्कम व विविध मोबाईल असा ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिडीत महिलांची सुटका करत चौघा जणांच्या विरुद्ध महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात बीएनएस १४३ () सह स्रीया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, , , , ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पो.नि.बालाजी वैद्य, .फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, महिला पो.कॉ. छाया रांधवन, होमगार्ड सुभाष भांड, मयूर भट, शैलेश अढागळे, मंगेश अहिर तसेच तोफखाना पोलिस ठाण्याचे पो. नि. जगदीश भांबळ, नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे या 'अँक्यूम मसाज पार्लर/स्पा सेंटर'वर गेल्या ६ महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्येही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई करत गुन्हा दाखल केला होता.      


 

0/Post a Comment/Comments