मुंबई - अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेल नसल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता चांगलीच खळबळ उडाली आहे.
ते म्हणाले, राज्यातील काही पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा पोहचवण्यास उशीर लागतो आहे. परंतू पेट्रोल डिझेल मिळत नाही, अशी अद्याप आली नाही. जर तक्रार आली तर त्यावर राज्य सरकार कार्यवाही करेन. पण तूर्तास अशी परिस्थिती नाही. पुढे बोललाना, राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी असं विधान केलं असलं तरी तेल, वायू किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात दोन वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आलं आहेत. गेल्या शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यांचा थेट फटका आता नागरिकांना बसतो आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भावही वाढले आहेत.

Post a Comment