नगर (तालुका प्रतिनिधी) - एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात ९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सर्जेराव अर्जुन खेंगट (वय ४९, रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव खेंगट यांनी ८ जुलै च्या रात्री ते ९ जुलै च्या सकाळी ८ च्या दरम्यान बाबुर्डी बेंद शिवारातील ओढ्याच्या कडेला असलेल्या एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ गोरख गणपत खेंगट यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ९ जुलै रोजी सकाळी ८.१८ वाजता नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत खेंगट यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment