राहुरी -राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील आंबेकर वस्ती येथे एका मातेने आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुर्यभान भागा आंबेकर (वय ३८, रा. आंबेकर वस्ती, कोळेवाडी, ता. राहुरी) यांनी १५ जुलै रोजी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुर्यभान आंबेकर यांच्या राहत्या घरी १५ जून २०२६ रोजी रात्री १०.३० वाजेपासून ते १६ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मृत आशा सुर्यभान आंबेकर (वय ३२) हिने मानसिक तणावाखाली येऊन फिर्यादीचा मुलगा शिवांश सुर्यभान आंबेकर (वय १ वर्ष ६ महिने) याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर अत्यंत टोकाचे पाऊल उचलत आशा आंबेकर हिने स्वतः देखील घरात त्याच नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर उपविभागाचे एसडीपीओ भवार आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी मृत आशा आंबेकर हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लवांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट

Post a Comment