पारनेर - पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत जिल्हा बँकेसाठीची ठराव प्रक्रिया चालू असताना कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणाऱ्या आणि बंदोबस्तावरील पोलिसांवर धावून जाणाऱ्यांविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी सकाळी ११ ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत सुपा पोलीस स्टेशनचे पो.कॉ.विकास गायकवाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. रुई छत्रपती सोसायटीच्या कार्यालयासमोर ठराव प्रक्रिया सुरू असताना आरोपी कचरू मेहेत्रे, सखाराम मेहेत्रे, किरण मेहेत्रे, खुशाल मेहेत्रे, पोपट मेहेत्रे यांची पत्नी, सचिन पठारे, रोहन लंके, जितेश सरडे, राजू शिंदे, लाला भोंडवे, दत्ता दिवटे, जनार्दन दिवटे, सागर गवळी, गणेश दुबे, अवधूत गवळी, प्रकाश गुंड, संतोष तरटे, किशोर लगड, विकास दगाबाज, अतिश साबळे, आत्माराम जगदाळे व इतर २५ अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर मंडळी जमवली.
या मंडळींनी ठरावाच्या वेळी सदस्यांना कार्यालयाच्या आत जाण्यास अडथळा निर्माण केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार आणि महिला होमगार्ड यांना तेथील महिलांनी शिवीगाळ केली. 'आम्ही सोसायटीचा ठराव होऊ देणार नाही' असे म्हणून आरोपी पोलिसांवर धावून गेले. त्यांनी सोसायटीचा ठराव होण्यास मज्जाव करून अडथळा निर्माण केला आणि जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला.
या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६(२), १८९(२), १९१(२), २२१ आणि मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोठुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट

Post a Comment