अहिल्यानगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे, बँकेच्या सभासद संस्थांचे 3 हजार 128 ठराव संकलीत झाले आहेत. बँकेच्या सभासद संस्थांची संख्या 5 हजार 890 आहे. त्यातुलनेत संकलित झालेल्या ठरावांची संख्या अत्यंत कमी आहे. यातही अनेक ठराव हे बंद पडलेल्या संस्थांचे असून सहाकार विभागाच्या नियमांच्या चाळणीत बंद पडलेल्या संख्याचे ठराव वगळ्ल्यानंतर जिल्हा बँकेसाठी अवघे 2 हजार 500 ते 3 हजारांच्या दरम्यान ठराव राहणार असल्याचा अंदाज आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सभासद संस्थांनी 16 जुलैपर्यंत ठराव पाठवण्याची मुदत होती. त्यानुसार जिल्हाभरातून संकलित झालेले ठराव 3 हजार 128 ठराव संकलीत झाले आहेत. ठराव आलेल्या संख्या सुरू आहेत की नाहीत. नियमानुसार त्या मतदानास पात्र आहेत की याची तपासणी सहकार विभागाकडून करण्यात येणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी हे ठराव सहकार विभागाच्या सहनिबंधकांकडे (नाशिक) पाठवण्यात आले आहेत. या ठरावांची यादी छाननी करून पात्र नसलेले ठराव कमी केले जाणार आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बँकेच्या सभासद असलेल्या अनेक संस्था अवसायानात निघालेल्या आहेत. काही बंद पडलेल्या आहेत, काहींची नोंदणी रद्द झालेली आहे, काही बंद पडलेल्या पतसंस्थांचे विलीनीकरण करण्यात आलेले आहे. शिवाय बँकेने 1 जून 2013 या अर्हता तारखेनुसार निवडणुकीसाठी सभासदांची संख्या निश्चित केलेली आहे तसेच शेअरची रक्कम पाच हजार रुपये भरलेले सभासदच मतदानासाठी पात्र ठरवले जाणार आहेत. त्यामुळे सभासद संस्थांकडून मतदारांच्या नावाचे ठराव आले असले तरी ते मतदानास पात्र म्हणजेच, प्रारूप मतदार यादी त्यांचा समावेश होईल असे नाही. त्यामुळे झालेल्या ठरावापेक्षा कमी संख्येने मतदार प्रारूप यादीत असण्याची शक्यता वर्तवली जाते.
बँकेसाठी विकास सेवा संस्था 1 हजार 414 असल्या तरी ठराव 1 हजार 367, बिगर शेती संस्थांची संख्या 2 हजार 337 असताना मात्र ठराव 1 हजार 518 तर शेतीपूरक संस्था 2 हजार 139 तर ठराव केवळ 243 प्राप्त झाले आहेत. एकूण 5 हजार 890 सभासद संस्थांपैकी 3128 ठराव संकलीत झाले आहेत. पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा ठरावांची संख्या साडे पाच हजारांहून एकदम 2 हजार 500 ते 3 हजारांच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज आहे. याचा अर्थ दरवर्षीच्या तुलनेत यंदा ठराव (मतदारांची संख्या) ही निम्म्याने घटणार आहे.
तालुकानिहाय प्राप्त झालेले ठराव
संगमनेर 407, शेवगाव 99, पाथर्डी 121, कर्जत 146, श्रीरामपूर 143, कोपरगाव 418, पारनेर 197, अकोले 164, राहता 195, नेवासा 235, श्रीगोंदा 293, नगर 365, जामखेड 107 व राहुरी 238.

Post a Comment