झुरळांचा दणका! मोदींच्या नॉट आऊट च्या यादीतील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांची विकेट गेली


नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून प्रधान त्यांच्या मंत्रिमंडळात होते. गेल्या १२ वर्षांपासून ते मंत्रिमंडळाचा भाग होते. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रालयं सांभाळली. प्रधान यांचा राजीनामा होण्याची शक्यता धूसर मानली जात होती. त्याऐवजी सरकार शिक्षण मंत्रालयात आमूलाग्र बदल घडवेल आणि परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक करेल, असं सांगितलं जात होतं. पण सीजेपीनं प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन जराही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला.

काहीही झाले तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका सीजेपीने घेतली होती. तरुणांच्या या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेने प्रयत्न केले, परंतु सरकारला त्यात यश आले नाही. 

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना तीव्र स्वरूपाचा टायफाईड झालेला असतानाही, त्यांनी प्रकृतीची पर्वा न करता दिल्लीच्या मैदानावर आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यांच्या या जिद्दीचा आणि आंदोलनाच्या तीव्रतेचाच परिणाम म्हणून अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले असून, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे बोलले जात आहे. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. तेव्हापासून प्रधान त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. विशेष म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रालयाचं कामकाज होतं. ओबीसी समुदायातून येणारे प्रधान ओदिशातील प्रमुख नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबादेखील प्रधान यांना मिळत आलेला आहे. भाजपमध्ये येण्याआधी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलं. ते आयात झालेले नेते नाहीत. तर कट्टर भाजप नेते आहेत.

नॉट आऊट च्या यादीत आता फक्त ६ मंत्री 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात राहण्याची किमया केवळ ७ नेत्यांना साधता आलेली आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, किरण रिजिजू, गिरीराज सिंह आणि धर्मेंद्र प्रधान या सातच नेत्यांना १२ वर्षे त्यांची कॅबिनेट मंत्रीपदं टिकवता आलेली आहेत. आता या नॉट आऊट १२ च्या यादीतून प्रधान यांचं बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे या यादीत ६ मंत्री उरले आहेत.


0/Post a Comment/Comments