नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या संयुक्ता काळेचा राष्ट्रीय ज्युनियर जिम्नॅस्टिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम

मुंबई - (विशेष क्रीडा प्रतिनिधी) 

मुळची नगर तालुक्यातील सारोळा कासारची रहिवासी व सध्या वडिलांच्या नोकरीनिमित्त ठाण्यात राहात असलेली  आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिने राष्ट्रीय ज्युनियर जिम्नॅस्टिक स्पर्धेत १-२ नव्हे तर ५ सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दहावीला असलेल्या संयुक्ताने पहिल्या टर्मचा एक पेपर न देता राष्ट्रीय स्पर्धेस महत्त्व दिले.

जम्मु मध्ये २५ वी राष्ट्रीय ज्युनियर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा नुकतीच दि.२१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे. दहावी सीबीएसइमध्ये शिकत असलेल्या संयुक्ता काळे हीचा पहिल्या सत्रातील आयटीचा (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पहिला पेपर मागील आठवड्यात होता, पण तिने तो पेपर दिला नाही. नव्या पद्धतीत अंतिम परिक्षा दोन सत्रांची आहे. दुसऱ्या सत्रातील गुणांनुसार तिला पहिल्या सत्रातील या पेपरचे गुण देण्यात येणार आहे, असे संयुक्ताच्या आईने सांगितले.

ठाण्यातील फिनिक्स जिमनॅस्टिक अकादमीत मानसी सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या संयुक्ता काळे हीने ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमधील सर्वांगीण प्रकाराबरोबरच बॉल, क्लब्ज, हूप तसेच रिबन प्रकारात अव्वल क्रमांक मिळवला. आशियाई स्पर्धेत (२०१९) क्लब्ज प्रकारात अंतिम फेरी गाठलेली ती भारताची पहिली स्पर्धक आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेते पदाचे पारितोषिक संयुक्ता काळे हिला देण्यात आले.

संयुक्ता ही सारोळा कासार मधील दिवंगत भूगर्भ शास्रज्ञ प्रतापराव काळे, कै.विक्रमराव काळे व माजी प्राचार्य विश्वासराव काळे यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


खर तर या स्पर्धेत ६ सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु ५ सुवर्ण आणि १ रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर कामगिरीही चांगली झाली. या स्पर्धेसाठी कसून सराव केला होता. त्यासाठी शाळेतही गेले नव्हते. दोन वर्षानंतर ही स्पर्धा झाली, त्यामुळे ती जास्तच खडतर झाली. असे संयुक्ता काळे हिने बोलताना सांगितले.

1/Post a Comment/Comments

  1. Congratulations Sanyukta. Very nice done well We are proud of your Achievements God bless you. Popatrao kale and family Ahmednagar

    ReplyDelete

Post a Comment