पारनेर - ठेवीदाराची १.१० कोटीची फसवणूक, पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल


पारनेर (प्रतिनिधी) - पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या, मात्र ठेवींची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदार व त्याच्या कुटुंबियांची १ कोटी १० लाख ८ हजार ३२३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत घडली आहे. या प्रकरणी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी अशा २२ जणांवर ५ नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ठेवीदार भाऊसाहेब लिंबाजी थोरात (वय ६२, रा. पिंप्री जलसेन, ता.पारनेर, हल्ली रा. खराडी, पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने ठेवींवर ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या कडून ठेवी घेतल्या. त्या ठेवींची मुदत संपल्यावर फिर्यादी हे संस्थेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.रोख रक्कम शिल्लक नाही, भरणा येणार आहे. काही दिवसांत पैसे देवू असे सांगत टोलवाटोलवी केली.

फिर्यादीने याबाबत पदाधिकारी व संचालक मंडळाशी संपर्क साधला असता त्यांनीही वेगवेगळी कारणे सांगत वेळ मारून नेली. अनेकदा पाठ पुरावा करूनही ठेवींची सुमारे १ कोटी १० लाख ८ हजार ३२३ रुपये एवढी रक्कम पतसंस्थेकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. संस्थेकडून आपली फसवणूक करण्यात आली असल्याचे लक्षात आल्यावर भाऊसाहेब थोरात यांनी ५ नोव्हेंबर रोजी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादी वरून पोलिसांनी संस्थेचे चेअरमन प्रभाकर नारायण कवाद, व्हाईस चेअरमन रामदास बाबुराव लंके, संचालक बाळासाहेब गणाजी लामखडे, मच्छिंद्र जिजाबा लंके, नामदेव हरिभाऊ पठारे, रायचंद खंडू गुंड, भाऊसाहेब विठोबा लामखडे, संतोष बन्सी येवले, भास्कर तुकाराम शेळके, राजेंद्र भागा लाळगे, प्रकाश शिवराम कवाद, वसंत जानकू बुचडे, मुकुंद रामचंद्र निघोजकर, शंकर रामचंद्र वराळ, संजय बबन सोनवणे, पुष्पा प्रकाश पांढरकर, विजया लहू वागदरे, अविनाश पंढरीनाथ गांढरे, रामदास बाबुराव रोहिले, व्यवस्थापक दिलीप पोपटराव वराळ, पिंप्री जलसेन शाखाधिकारी संपत गणाची लामखडे, विशेष वसुली अधिकारी व तज्ञ संचालक संतोष बाबुराव साबळे या २२ जणांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (), ३१६ (), ३१६ (), () सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास स.पो.नि. नितीन खंडागळे हे करत आहेत

हे ही वाचा ...

नगरमधील बुद्धीबळ स्पर्धेत राज्यासह देशातील २७० बुद्धीबळपटूंचा सहभाग

0/Post a Comment/Comments