६ मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली


नागपूर - महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज रविवारी (दि.१५ डिसेंबर) सायंकाळी पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या मध्ये प्रामुख्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. क्षेत्रफळात राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात ते एकमेव मंत्री असतील.

कॅबिनेट मंत्री – (भाजपा) - चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, गणेश नाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, संजय सावकारे, अशोक उईके, आशिष शेलार, नितेश राणे, आकाश फुंडकर  

कॅबिनेट मंत्री – (शिवसेना) - उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट.

कॅबिनेट मंत्री – (राष्ट्रवादी काँग्रेस) - आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे

राज्यमंत्री - माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर (भाजपा), आशिष जैस्वाल, योगश कदम (शिवसेना), इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)  

भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह २० मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १२ मंत्रि‍पदे मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळणार आहेत.  

महाराष्ट्रात तब्बल ३३ वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी झाला. यापूर्वी २१ डिसेंबर १९९१ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता.

1/Post a Comment/Comments

Post a Comment