विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जि.प. शाळेला जमा झाली १ लाख ८४ हजारांची देणगी

नगर तालुका (प्रतिनिधी) - शिक्षणासोबत मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा कासार शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडले. चिमुकल्यांच्या या बहारदार कार्यक्रमांनी ग्रामस्थांची मने जिंकली. त्यामुळे ग्रामस्थांनीही या विद्यार्थ्यावर बक्षिसांचा वर्षाव करत शाळेला १ लाख ८४ हजारांची देणगी दिली.

या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे, केंद्रप्रमुख उत्तम भोसले, संजय धामणे व किशोर हारदे, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी लिंभोरे, शाळा व्य.समितीचे अध्यक्ष ऐश्वर्य मैड, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संतोष गायकवाड, संजय देवराम धामणे, संजय राभाजी काळे, शिवाजी कडूस, बाजार समितीचे सहसचिव संजय काळे, माजी सरपंच लताताई कडूस, माजी उपसरपंच जयप्रकाश पाटील, उषाताई गट, ग्रामपंचायत सदस्य स्वाती धामणे, रुपाली हारदे, उद्योजक नामदेव धामणे, चेअरमन महेश धामणे, विजय धामणे, सुभाष धामणे, शरद धामणे, शिवराज धामणे,बाळासाहेब गट, प्रशांत दरवडे, एम डी जाधव, मोहन काळे, पंडित पाटील, बाळासाहेब कडूस, नवनाथ कडूस, पप्पू राहिंज विविध समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, अकोळनेर केंद्रातील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय प्रांगणात अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या मुलांचा  स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविकात मुख्याध्यापक वैजीनाथ धामणे यांनी आजपर्यंत शाळेत राबवलेले विविध उपक्रम, ग्रामपंचायत व सोसायटी तसेच मिशन आपुलकीतून झालेली कामे, मिशन शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेतील यश व शाळेस मिळालेल्या भौतिक सुविधा तसेच भविष्यात करावयाची कामे याबद्दल माहिती दिली. शिक्षणाधिकारी पाटील यांनी सर्व गाव हे एक सुशिक्षित व कोणतीही जबाबदारी पेलणारे असे गाव. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या माध्यमातून, ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात अतिशय सुंदर असे ओपन सायन्स पार्क तयार झाले. अशी प्रतिक्रिया देऊन मिशन आपुलकी अंतर्गत सर्वांनी सहकार्य करण्याचे ग्रामस्थांना आव्हान केले.

कार्यक्रमात देशभक्तीपर, शिवराय शौर्य गाथा, लावणीनृत्य, कोळीगीत, बालगीत, धार्मिक नाटिका व शैक्षणिक कार्यक्रम बाल कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामस्थांकडून १ लाख ८४ हजार रुपये बक्षीस रुपी मिळाले. तर मिशन आपुलकी अंतर्गत भविष्यात बांधावयाच्या सांस्कृतिक हॉल बांधकामासाठी शाळेचे मुख्याध्यापक वैजीनाथ धामणे व ज्योती धामणे यांच्याकडून ५१ हजार देणगी शाळेला देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली काळे व दत्ता जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक बाबासाहेब धामणे, सविता लोंढे, ज्योती धामणे, महिमा नगरे, अंगणवाडी सेविका भारतीताई धामणे, मंदाताई कडूस, सुनीताताई कोठुळे आदींनी परिश्रम घेतले.

 

0/Post a Comment/Comments