कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने नागापूरच्या श्री वीरभद्र बिरोबा यात्रेची सांगता


नगर - नगर शहराजवळील नागापूर व नवनागापूर (ता.नगर) येथील ग्रामस्थाचे  ग्रामदैवत श्री. वीरभद्र बिरोबा यात्रेची कुस्त्यांच्या जंगी आखाड्यानी सांगता झाली. या आखाड्यात जिल्हाभरातून कुस्तीगीर सहभागी झाले होते. चीतपट कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

 नागापूर येथे श्री विरभद्र बिरोबा देवस्थानच्या यात्रेचे सालाबादप्रमाणे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. २० एप्रिल रोजी मानाच्या काठीची भव्य अशी मिरवणूक काढण्या आली. यावेळी  आकर्षक आतषबाजी करण्यात आली. २१ एप्रिल रोजी भव्य अशा कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले, दत्ता पाटील सप्रे, संजू भोर यांच्या हस्ते आखाडयाचे उद्घाटन करण्यात आले. पाचशे रुपयांपासून दहा हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. आखाडा पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती शौकीनांनी मल्लांवर बक्षिसाचा वर्षाव केला. यातील बहुतांश कुस्त्या काही क्षणातच चितपट झाल्या. शेवटच्या मानाच्या कुस्ती विजेत्याला चांदीची गदा देण्यात आली.

 पंच म्हणून साहेबराव सप्रे व हनुमान कातोरे यांनी काम पाहिले. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा उत्सवासाठी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब भोर, रमेश सप्रे, कुंडलिक कातोरे, आजिनाथ सप्रे, सचिन भोर, आबा महाराज कातोरे, राहुल कातोरे, आकाश बारस्कर, भैरवनाथ भोर, भैय्या भोर, किशोर सप्रे, नवनाथ कातोरे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी गावातील समस्त जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन व युवकांचा सक्रिय सहभाग लाभला. यात्रा कमिटीचे वतीने समस्त गावकरी व परिसरातील उद्योजकाचे आभार मानण्यात आले. या आखाड्यासाठी माजी नगरसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments