अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सध्या सोशल मिडीयामुळे युवा पिढी भरकटलेली आहे. मात्र युवा पिढीने खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास खेळ ही करिअर करण्याची चांगली संधी आहे. अविरत कष्ट व जिद्दीच्या जोरावर तुम्ही यशाला गवसणी घालू शकता असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रिडापुरस्कार मिळालेले खेळाडू शंकर गदई, असलम इनामदार, डॉ. शुभांगी रोकडे, कोमल वाकळे यांचा तसेच राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या नगर जिल्हा कबड्डी संघाचा नगरमध्ये गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे उपाध्यक्ष जयंत वाघ होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, जिल्हा क्रिडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, माजी क्रिडा अधिकारी अजय पवार, सुधीर चपळगावकर, संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे आदि उपस्थीत होते.
यावेळी डांगे यांनी नगरमधील मिस्कीनमळा व सारसनगर येथे क्रिडां संकुल उभारण्यात येत असल्याची माहिती दिली. कबड्डी संघटनेचे सचिव प्रा.शशिकांत गाडे यांनी नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नगर जिल्हयाचे कबड्डी वैभव वाढावे यासाठी हा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच प्रो कबड्डी खेळण्यात सर्वात जास्त खेळाडू नगरचे होते. यापुढे नगरचा संघ अजिंक्यपद पटकवेल असा दावा केला. स्वागत कैलास पठारे यांनी तर आभार संघटनेचे उपाध्यक्ष जयंत वाघ यांनी मानले. यावेळी विजयसिह मिस्कीन , प्रा.पोपट कडुस, प्रा. गोविंद भुजबळ, बाळासाहेब कडुस, सुधाकर सुंबे, शंतनु पांडव, प्रा. संजय साठे, प्राचार्य सोपान काळे, बाबासाहेब गुंजाळ , संपतराव म्हस्के, दत्तात्रय वाकचौरे, विनायक भुतकर तसेच खेळाडू व क्रिडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थीत होते.
Post a Comment