सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, ९ वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त


मुंबई - मनोरंजन क्षेत्रात नातेसंबंध जोडणं आणि तोडणं ही सामान्य गोष्ट आहे. आता 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीचा देखील तिच्या पतीपासून घटस्फोटाचा घेतला आहे. 'पृथ्वीराज चौहान' आणि 'कुमकुम भाग्य' या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री मुग्धा चाफेकरचा घटस्फोट झाला आहे. मुग्धाचा पती रवीश देसाईने ९ वर्षांच्या लग्नानंतर वेगळं होण्याची घोषणा केली आहे.

टीव्ही कपल रवीश देसाई आणि मुग्धा चाफेकर यांचं ९ वर्षांचं लग्न मोडलं आहे. रवीशने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून पत्नी मुग्धासोबत घटस्फोटाची घोषणा केली. त्याने असंही सांगितलं की, ते गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत आणि आता, खूप विचारविनिमयानंतर, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. रवीशने सर्वांना, त्याला आणि मुग्धाला प्रायव्हसी देण्याचं आवाहन केलं आणि 'खोट्या कथांवर' विश्वास ठेवू नका असं सांगितलंय.

रवीशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'खूप विचार केल्यानंतर, मुग्धा आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा आणि आमचे वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. आम्ही प्रेम, मैत्री आणि आदराचा एक सुंदर प्रवास एकत्र केला आहे आणि तो आयुष्यभर चालू राहील. आम्ही आमच्या प्रिय चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी पाठिंबा द्यावा आणि आम्हाला आवश्यक असलेली प्रायव्हसी द्यावी. कृपया कोणत्याही खोट्या कथा आणि विधानांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.'

रवीशने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर घटस्फोटाची घोषणा केली असली तरी, मुग्धाने यावर मौन बाळगलं आहे आणि तिच्या घटस्फोटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या जोडप्याच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप कळलेलं नाही.

0/Post a Comment/Comments