नगर तालुका (प्रतिनिधी) – नुकताच जाहीर झालेला युपीएससीचा निकाल आणि २ महिन्यांपूर्वी लागलेल्या एमपीएससी च्या निकालात टॉपर ठरलेल्या बहुतांश जणांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया हा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पक्का झालेला असल्याचे समोर आले आहे. या शिवाय ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अव्वल ठरली असल्याने या वर्षी अनेक शाळांमध्ये ५ वी चे वर्ग सुरु करण्याचे प्रस्ताव आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रेल्वेस्टेशन, सुभाषवाडी, जुना सारोळा, बारेमळा व काळे मळा या ५ क्लास शाळा व त्यास जोडून असलेल्या अंगणवाड्यामधील चिमुकल्यांचे एकत्रित वार्षिक स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक जल्लोष कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस होते. तर यावेळी गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर, केंद्र प्रमुख उत्तम भोसले, किशोर हारदे, संजय धामणे, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यभान काळे, एस.टी. बँकेचे माजी संचालक शिवाजी कडूस, शिवाजी लिंभोरे, उद्योजक नामदेव धामणे, बाजार समितीचे सहसचिव संजय काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून मिशन आपुलकी व मिशन आरंभ हे २ महत्वकांशी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे शाळांचा भौतिक विकास होण्यासोबत विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक विकास होत आहे. समाजही त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे ही नव्या बदलाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, जिल्ह्यात ५ शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची निर्मिती झाली असून त्यात सारोळा कासारची शाळा आहे. या पार्कचा परिसरातील शाळांमधील शिक्षकांनी विद्यर्थ्यांना उपयोग होण्यासाठी प्रयत्न करावेत, शैक्षणिक सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अधिक ज्ञान कसे मिळेल याचा प्रयत्न करावा, तसेच या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच एक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येईल असे सांगत या शाळांमधून जास्तीत जास्त अधिकारी तयार व्हावेत या दृष्टीने शिक्षक व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करू असे ते म्हणाले.
यावेळी सर्व क्लास शाळांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तर ग्रामस्थांनीही या चिमुकल्यांवर मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशन शाळेच्या शिक्षिका रेश्मा गांगर्डे, तेजश्री पुजारी, काळे मळा शाळेच्या सुनिता लांडगे, मेघा रासकर, जुना सारोळा शाळेच्या रुख्मिणी गवळी, दिपाली साबळे, बारेमळा शाळेच्या प्राजक्ता हराळ, ललिता ठोंबरे, सुभाषवाडी शाळेच्या सुनंदा कडूस, सीमा गावडे यांच्या सह अंगणवाडी सेविका सुमन कडूस, धनश्री काळे, अनिता कडूस, मनीषा थोरात, मंदा धामणे, आरती जाधव, संगीता गट, निर्मला कडूस, उषा काळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्ता जाधव व तात्याराम कडूस यांनी केले.
या कार्यक्रमास केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक संजय कडूस, सारोळा कासार सोसायटीचे चेअरमन महेश धामणे, अरुण काळे सर, सुभाष काळे सर, संजय गांधी निराधार योजना समितीचे जयप्रकाश पाटील, उपसरपंच योगिता लिंभोरे, अशोक धामणे सर, सुभाष धामणे सर, संजय रभाजी काळे सर, रमजान शेख सर, वैजीनाथ धामणे सर, बाबासाहेब धामणे सर, रवी कडूस सर, विजय कडूस सर, सुनील धामणे सर, ऋषी गोरे सर, प्रशांत दरवडे, मुकुंद कुलांगे, अविनाश बचाटे, बंडू झगडे, अनिल कडूस सर, रमेश काळे सर, शहाजहान तांबोळी, अविनाश धामणे, ग्रामपंचायत सदस्य रोहित काळे, शिक्षक नेते गहिनीनाथ पिंपळे, शिक्षक नेते बी.के. बनकर, युवराज गारुडकर यांच्या सह अहिल्यानगर तालुक्यातून व जिल्ह्यातून शिक्षक बंधू, भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment