राज्यात १२ ते १५ मे दरम्यान वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, 'या' जिल्ह्यांत अलर्ट



जालना (प्रतिनिधी)-  मागील आठवड्यापासून राज्यात विविध भागांना झोपून काढणारा मान्सूनपूर्व अवकाळीचा पाऊस सध्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर  पुन्हा ११ मे रोजी सक्रिय होणार आहे. त्यात मान्सून देखील अंदमान निकोबार बेटावर येण्याची घाई करतोय. अशी माहिती जालना येथील तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेच्या वतीने अशोक तोडकर यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी तारखेनुसार देखील वातावरणाच्या अवकाळीची पूर्वकल्पना अशा स्वरूपामध्ये मांडली...

दि.११ मे रोजी दुपारनंतर वातावरण हे काही भागांमध्ये सक्रिय होईल. यामध्ये पुणे, नाशिक, जालना, जळगाव काही ठिकाणी, अहिल्यानगर परिसर बऱ्याच ठिकाणी, बुलढाणा सुद्धा मोजक्या ठिकाणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा काही ठिकाणी.

तर १२ मे ते १६ मे च्या काळामध्ये दररोज भाग बदलत विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा या पुढील जिल्ह्यांना दिला आहे. त्यामध्ये जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, आहिल्यानगर परिसर, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती या भागांना सर्वाधिक जास्त तीव्रता राहील त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना याच काळात भाग बदलत पावसाची शक्‍यता राहील यातही काही ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार राहील. खानदेशातही सर्व जिल्ह्यांना भाग बदलत हा पाऊस सक्रिय होणार आहे.

आता पाहूया मान्सून बाबतीत...

१४ ते १५ तारखेचा दरम्यान मान्सून अंदमान, निकोबार पर्यंत मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ८ दिवस अगोदर येतोय. मान्सून आल्यानंतर समुद्रामध्ये वेगवान हालचाली देखील होणार आहेत. या हालचालींना दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्यामुळे मान्सून वरती किती अडथळे आहेत हे देखील तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत सखोल मार्गदर्शन केले जाते. 

यंदा सुद्धा मान्सूनला काही अडथळे राहण्याची चान्सेस आहेत त्यामुळे मान्सून लवकर येईल पण अडथळ्यामुळे पुन्हा पुन्हा थोडा लांबणार आहे पेरणी कालावधी नंतर  मान्सून दडी मारण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. मान्सून वरती पेरण्या वेळेवरच पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दिं.१२ जुन आसपास होण्याचे चान्सेस ७० ते ६५ टक्के एवढे आहेत.८० मिमी ते १०० मिमी पाऊस झाल्याच्या नंतरच आपल्याला पेरणी करावी लागणार आहे. पेरणीची घाई आपल्याला दुबार पेरणीची आपल्या वर संकट आणु शकते असे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा, जालना यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments