कर्जत (तालुका प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरोग्यसेवकाचा नगर - सोलापूर महामार्गावर घोगरगाव शिवारात सोमवारी (दि.१२) सकाळी १०.३० च्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. आरोग्य सेवक संतोष कांतीलाल भैलुमे (वय ४७, रा.सिद्धार्थनगर, कर्जत) असे मयताचे नाव आहे.
मयत भैलुमे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून बनपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत होते. त्यांना प्रमोशन मिळाल्याने सोमवारी (दि.१२) सकाळी ते नगर-सोलापूर महामार्गाने दुचाकीवरून प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी नगरकडे जात असताना घोगरगाव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की संतोष भैलुमे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अतुल कांतिलाल भैलुमे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment