मुंबई - पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री असलेल्या भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. कधी क्रिकेटच्या मैदानावर बॅट घेऊन तर कधी आदिवासी नृत्यावर नवनीत राणा ठेका धरताना दिसतात. त्यांची ही कृती लक्ष वेधून घेणारी असते. अशातच आता नवनीत राणा यांचा पावसाचा आनंद लुटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नवनीत राणा यांच्या हातात या व्हिडीओत छत्री दिसत असून त्या एका हिंदी गाण्यावर नाचताना पाहायला मिळत आहे. किसी के हात ना आयेगी ये लडकी असे म्हणत नवनीत राणा डान्स करत आहे. या गाण्यातून त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, नवनीत राणा यांच्या या डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ अल्पावधीतच हजारो लोकांनी पाहिला असून, त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पहा व्हिडीओ...
Post a Comment