नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील मंदिराजवळ ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (२१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. गणेश दादाराव कोतकर (वय ४०, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० वाजता जेऊरं बायजाबाई मंदिराजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गणेश कोतकर आढळून आले. तातडीने त्याला नातेवाईक नवनाथ रावसाहेब उतके (वय ४५, रा. म्हसोबा परखेड, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. जेऊर बायजाबाई) यांनी उपचारासाठी जिल्हा सरकारी रूग्णालय दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांनी तपासून कोतकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास अंमलदार पितळे करीत आहेत.
Post a Comment