मुंबई: मनोरंजनसृष्टीत कलाकारांच्या जोड्या जमणं नवं नाही. या जोड्या चित्रपटांसाठी जमतात, तशाच त्या वैयक्तिक आयुष्यातही जमल्याचं पाहायला मिळतं. सध्या अशीच अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष ही जोडी जमल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात धनुष आणि ती हातात हात घालून छान संवाद साधत आहेत. सभोवती लोकांचा गराडा असल्यानं हे दोघं एका बाजूला जाऊन बोलत असल्याचंही त्यात पाहायला मिळतंय.
विशेष म्हणजे, जेव्हा मृणालच्या 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी धनुष मुंबईत आला, तेव्हा या चर्चांना आणखी उधाण आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघं नात्यात असल्याचं त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनाही माहीत आहे आणि त्यांच्यामार्फतच या चर्चेला खतपाणी मिळालं आहे.
तर अशीही चर्चा
इकंच नाही तर या दोघांच्या नात्याबद्दल आता दोघांच्या कुटुंबियांनाही माहिती आहे, त्यांनाही या नात्याला होकार दिलाय, अशीही चर्चा इंडस्ट्रीत आहे. धनुषनं तिच्या बहिणीसोबत मृणालची भेट घडवूण आणली होती. दोघींनी या भेटीत छान गप्पा मारल्या, तसंच मृणाल धनुषच्या इतर कुटुंबियांनाही भेटली होती,असंही समोर आलाय.
इतक्यात नात्याची चर्चा नको...
धनुष आणि मृणाल यांच्या मित्र-मैत्रिणींना देखील त्यांच्या डेटिंगबद्दल माहिती आहे, दोघांचे स्वभाव एकसारखे आहे, दोघेही पार्टनर म्हणून एकमेकांना पूरक आहे, असं त्यांच्या मित्र मैत्रिणींनाही वाटतंय...त्यामुळे ते देखील खूष असल्याचं म्हटलं जातंय. पण ही नात्याची सुरुवात असल्यानं इतक्या तरी नात्याबद्दल फार काही बोलायचं नाहीये, असं धनुष आणि मृणाल यांनी ठरवलंय.
चाहत्यांना उत्सुकता
दरम्यान, या चर्चा सुरू झाल्यानंतर या मृणाल आणि धनुष दोघांनीही नातं नाकारलं नाही, आणि होकारही दिला नाहीये त्यामुळं ...दोघांनी आता जाहीरपणे नात्याची कबुली देणं, एवढंच काय ते बाकी आहे. या सगळ्या चर्चेवर हे दोघं काय म्हणतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल
Post a Comment