लोकप्रिय अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल; नको त्या कुटाण्यांतून पैसे कमावल्याचा आरोप



मुंबई - दक्षिणात्य अभिनेत्री श्वेता मेनन अडचणीत सापडली असून अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मार्टिन मेनाचेरी यांच्या तक्रारीवरून एर्नाकुलम सीजेएम कोर्टाच्या निर्देशांनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, आर्थिक फायद्यासाठी अश्लील सीनमध्ये काम केल्याबद्दल अभिनेत्री श्वेता मेननविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मार्टिन मेनाचेरी यांच्या तक्रारीनंतर एर्नाकुलम सीजेएम कोर्टाच्या निर्देशांनंतर ही कारवाई करण्यात आली. अश्लीलता प्रतिबंधक कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्रीने आर्थिक फायद्यासाठी चित्रपट आणि जाहिरातींमध्ये, ज्यामध्ये नग्नता देखील समाविष्ट आहे,त्यावरून सोशल मीडिया आणि पोर्नोग्राफिक साइट्सद्वारे सीनचा प्रचार करून पैसे कमावल्याचा आरोप पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तक्रारीकर्त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, श्वेताने साकारलेल्या गर्भनिरोधक कंडोमच्या जाहिराती आणि 'रथिनिरवेदम', 'पलेरीमानिक्यम' आणि 'कालीमन्नू' सारख्या चित्रपटांमधील सीन अश्लील असल्याचं म्हटले आहे.

'बिग बॉस मल्याळम सीझन १' मध्ये सहभागी झालेली श्वेता मेनन एक अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. तिला १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब मिळाला होता. तिनं मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री 'बिग बॉस मल्याळम सीझन १' मध्ये दिसली आहे. १९९७ मध्ये आलेल्या 'इश्क' चित्रपटातील 'हमको तुमसे प्यार है' या गाण्यात श्वेता दिसली होती. 

या चित्रपटात अजय देवगण, काजोल, आमिर खान आणि जुही चावला होते. त्यानंतर ती सलमान खानच्या 'बंधन' मध्येही दिसली होती. श्वेता ३० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्वेताने मल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर तेलुगू चित्रपटात काम केल्यानंतर तिनं 'पृथ्वी', 'शिकारी', 'अशोका', 'खतरों के खिलाडी', 'हान मैं भी प्यार किया है', 'वध', 'मकबूल', 'हंगामा' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.

श्वेताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर तिनं दोनदा लग्न केलं आहे. अभिनेत्रीने पहिलं लग्न बॉलीवूड मॉडेल बॉबी भोसलेशी लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०११ मध्ये तिनं श्रीवलसन मेननशी दुसरं लग्न केलं.

0/Post a Comment/Comments