अहिल्यानगर - दगडफेकीत ८ पोलिस जखमी, २०० जणांवर गुन्हे दाखल, ३९ जणांची नावे निष्पन्न


अहिल्यानगर - नगर शहरात कोठला परिसरात महामार्गावर २९ सप्टेंबर रोजी रास्ता रोको करणाऱ्या जमावाने केलेल्या दगडफेकीत ८ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच यावेळी काही रिक्षा, मोटारसायकली व इतर वाहनांचे नुकसान झाले असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ३९ जणांची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरु केलेली आहे.

या बाबत तोफखाना पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत पो.ना. तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सर्फराज जहागीरदार (रा. दर्गादायरा रोड, मुकुंदनगर), कासीम शेख (रा. तख्ती दरवाजा), सुफीयान शेख (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), अय्युब तांबोळी उर्फ समोसेवाला (रा. कोठला), अजीम नुरमोहम्मद राजे (रा. तांबटकर गल्ली), फरदीन इरफान खान (रा.अलामीन ग्राउंड, मुकुंदनगर), जुनेद असीर शेख (रा. बेलदार गल्ली, झेंडीगेट), सलमान आरिफ शेख (रा. बेलदार गल्ली, झेंडीगेट), गुलफाम निहालउद्दीन अन्सारी (रा.कुरेशी हॉटेल मागे, कोठला), अबुतल शफी सय्यद (रा.गोविंदपुरा), शाहरुख फारुख शेख (रा.कोठला), मुदस्सर शब्बीर शेख (घासगल्ली, कोठला), अमान समीर सय्यद (रा. बजाज कॉलनी, मुकुंदनगर), राजिक अफरोज कुरेशी (बेपारी मोहल्ला, झेंडीगेट)हमजा शाहीद शेख (रा. बडी मस्जिद समोर, मुकुंदनगर), अल्तमश अल्ताफ शेख (रा. फकीरवाडा), शहाबाज हारून शेख (रा. शाहशरीफ नगर, मुकुंदनगर), अकिल राजमोहम्मद शेख (रा.जुना मुकुंदनगर), शेख जुबेर फारूक (रा. दर्गादायरा), शेख जय्यद जाहिद (रा.दर्गादायरा), सय्यद राहील मिराजमिया (रा.दर्गादायरा), अक्रम रियाज शेख (सूर्यानगर, तपोवन रोड), निसार दाऊद शेख (रा. मंगलगेट हवेली), सय्यद तरबेज मीर (दगडी चाळ, मुकुंदनगर), शेख अमीर अन्वर (रा.मुकुंदनगर), नदीम शौकत शेख (रा.पिंपळगाव उज्जैनी, ता.नगर), अदनान अल्ताफ अत्तार (रा.मुकुंदनगर), सोहेल अय्युब खान (रा.कोठला), इर्शाद जाकीर शेख (दगडी चाळ, मुकुंदनगर),जाकीर ताहीद शान (रा.कोठला), अत्तार जीशान कदीर (दगडी चाळ, मुकुंदनगर), दानेश रज्जाक शेख (रा.गोविंदपुरा), जॉकी निसार पठाण (रा.मुकुंदनगर), आसिफ सिकंदर शेख (रा. कृष्णा अपार्टमेंट, जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ), शानू उर्फ शहा बुरान फैजल (रा. तख्ती दरवाजा), सोहेल सादिक शेख (रा.झेंडीगेट), आतिक उर्फ अकिब मोहम्मद शेख (रा. भिंगार), सोहेल उर्फ शाहरुख मोहम्मद शेख (रा. भिंगार), रिजवान जाकीर शेख (रा. कोठला) यांच्यासह १४० ते १६० जणांवर बीएनएस कलम १३२, १२६ (२), १२१ (१), १२५, १८९ (२)(३)(४), १९१ (२)(३),१९०, ३२४ (४),४५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ३२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे. पुढील तपास स.पो.नि. गणेश वारुळे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments