नगर तालुका (प्रतिनिधी) - निंबळक (ता. नगर) गावातील एका तरुणाने १५ वर्षीय मुलीला वारंवार लग्नासाठी बळजबरी केल्याने तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२५ मध्ये घडली. चौकशीअंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संदीप साळवे (पूर्ण नाव माहीत नाही) असे त्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, गावातील संदीप साळवे हा मयत मुलीला वारंवार लग्नासाठी दमदाटी करून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक परदेशी गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Post a Comment