भारतीय इंजिनिअरचा अमेरिकन पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू



हैदराबाद: तेलंगणातील 32 वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन, जो पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता, त्यांला पोलिसांनी गोळ्या घातल्याची माहिती आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलिसांनी त्याच्या रूममेटशी झालेल्या कथित वादानंतर चाकूने हलला केल्याने त्याला गोळ्या घातल्याची माहिती आहे. भारतातील त्याच्या कुटुंबाने आता परराष्ट्र मंत्रालयाला त्याचा मृतदेह मिळवण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. मृतदेह सध्या औपचारिकतेसाठी सांता क्लारा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

तेलंगणातील महबूबनगर येथील त्याचे कुटुंब आणि मित्रांनी सांगितले की, निजामुद्दीन हा एक शांत, धार्मिक तरुण होता. कुटुंबाने म्हटले आहे की त्याच्या गोळीबाराच्या दोन आठवड्यांपूर्वी लिंक्डइनवर पोस्टमध्ये, निजामुद्दीनने वांशिक छळ, पगाराची फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल सार्वजनिकपणे तक्रारी केल्या होत्या.
निजामुद्दीनचे वडील, निवृत्त शिक्षक हुसनुद्दीन यांनी टाइम्सला सांगितले की, ही बातमी त्यांना 18 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील रायचूर येथील त्यांच्या मुलाच्या मित्राकडून मिळाली, जो सांता क्लारा येथे राहतो. मी माझ्या मुलाला अनेकदा कॉल केले, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर आम्हाला कळालं की त्याची हत्या करण्यात आली आहे, असंही हसनुद्दीन यांनी सांगितलं.

त्या दिवशी काय घडलं?

तर, सांता क्लारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात चाकू हल्ला झाल्याबद्दल 911 वर कॉल आल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचे म्हणणे आहे की अधिकाऱ्यांना हातात चाकू असलेल्या संशयिताचा सामना करावा लागला आणि त्याने पोलिसांच्या आदेशांचे पालन करण्यास नकार दिल्याने त्यांना गोळीबार करावा लागला. पोलिस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, संशयिताने त्याच्या रूममेटला खाली पाडले होते आणि त्याच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा झाल्या होत्या. मात्र, कुटुंबाने पोलिसांच्या या दाव्यांचं खंडन केले आहे. गोळी झाडण्यापूर्वी निजामुद्दीनने स्वतः पोलिसांना मदतीसाठी बोलावले होते, असंही सांगितलं जात आहे.

0/Post a Comment/Comments