नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - युनायटेड
किंगडमची राजधानी लंडनमध्ये स्थलांतराच्या विरोधात प्रचंड रॅली काढण्यात आली. या
रॅलीत अंदाजे दीड लाख लोक सहभागी झाले होते. टॉमी रॉबिन्सन यांनी “युनायटेड द
किंगडम” या नावाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये १ लाखापेक्षा जास्त
आंदोलकांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे देखील
दिसून आले. या रॅलीत अंदाजे १,१०,००० जण सहभागी झाल्याचे पोलिसांनी
सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच
लोक शांततेत निषेध करण्यासाठी आले होते. परंतु या आंदोलनात असेही काही लोक सामिल
होते, ज्यांचा
उद्दीष्ट हिंसाचार पसरवणे होते. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २५ जणांना
ताब्यात घेतले आहे. आणखी लोकांची ओळख पटवली जात आहे, ज्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
या निदर्शनांदरम्यान स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या
हॉटेल्सच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी यूनियन
जॅक आणि लाल-पांढऱ्या रंगाचे सेंट जॉर्ज क्रॉस असलेले ध्वज फडकावले. काही
आंदोलकांनी अमेरिकन आणि इस्रायलचे ध्वजही हातात घेतले होते. निदर्शकांनी
पंतप्रधानांवर टीका केली आणि स्थलांतरितांना घरी पाठवा, अशा
घोषणा दिल्या.
अनेक निदर्शकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ लिहिलेल्या टोप्या देखील घातल्या
होत्या. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर टीका करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी
देखील करण्यात आली. तर काहींनी ‘सेंड देम होम’ असे लिहिलेले बॅनर्स देखील हातात
घेतले होते.
संपूर्ण लंडनमध्ये शनिवारी मेट्रोपोलिटन पोलिसांनी सुमारे १,६०००
हून अधिकारी तैनात केले होते, ज्यामध्ये ५०० अधिकारी हे दुसऱ्या
दलातून आणण्यात आले होते. दोन आंदोलनांचे नियोजन करतान पोलिसांना काही
हाय-प्रोफाइल फुटबॅल सामने आणि शहरात इतर ठिकाणी असलेल्या कॉन्सर्टवर देखील लक्ष
ठेवावे लागले.
इंग्लंडच्या राजकीय वर्तुळात देशाच्या संकटात सापडलेल्या
अर्थव्यवस्थेचा मुद्दा मागे पडून स्थलांतरितांचा मुद्दा हा विशेष चर्चेत राहिला
आहे. यूकेमध्ये विक्रमी स्वरूपात asylum क्लेम पाहायला मिळत आहेत. या वर्षी
आतापर्यंत २८,००० हून अधिक स्थलांतरित इंग्लिश
चॅनेल पार करून लहान बोटींमधून देशात दाखल झाले आहेत.
नेपाळ आणि फ्रान्समध्ये अलिकडेच मोठ्या प्रमाणात राजकीय आणि
सामाजिक उलथापालथ झाली. नेपाळमध्ये, बरोजगारी, भ्रष्टाचार
आणि राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तरूण निदर्शक रस्त्यावर उतरले. तर, फ्रान्समध्ये
आक्षेपार्ह कायदे आणि आर्थिक धोरणांविरूद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि
रस्त्यावरील हिंसाचार झाल्याची माहिती आहे.
Post a Comment