गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे: संग्रामबापू भंडारे, आ.संग्राम जगतापही झाले आक्रमक



जालना - गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, असे वादग्रस्त विधान संग्रामबापू भंडारे यांनी केले आहे. जालना येथे बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे.

जालना येथे बोलताना संग्रामबापू भंडारे म्हणाले, गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे? भारतातील एका नटाकडून हरिण मारले गेले, तेव्हा बिश्नोई समाजाने मागणी केली होती की माफी मागा. पण तेव्हा दाऊदचा काळ होता, खान कुठे माफी मागतो? परंतू बिश्नोई समाजाच्या घरामधील एक छोटा मुलगा मोठा झाला, त्याचे नाव लॉरेन्स बिश्नोई, त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते काही खिसे कापणे, चाकू दाखवणे असे नाहीत. तो परदेशात फोन लावतो, कोणत्याही देशात जा, त्याचे सात -आठ कार्यकर्ते आहेतच.

पोलिसांनी हिंदूच्या पाठीमागे उभे राहावे

पुढे बोलताना संग्रामबापू म्हणाले, त्याने खानला मेसेज टाकायची सुरुवात केली की मी तुला ठोकणार आहे, देशभर एक मेसेज निर्माण झाला की हरिण मारले की लॉरेन्स ठोकतो. त्यामुळे देशातील हरणे सुरक्षित झाले, आता गाय वाचवण्यासाठी जी परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल. जालन्यातील अनवा गावांमध्ये गाईची आणि देवळाची विटंबना झाली, यांच्या टार्गेटवर गाई आणि देऊळ आहेत, पोलिसांनीही हिंदूच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

तसेच गावात जय श्रीरामचे घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले, तर दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, असेही वक्तव्य संग्रामबापू भंडारे यांनी केले. देशभरातील मंदिरांना सरकारच्या वतीने कॅमेरे लावले पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी, भगवाधारी बनवायचा असल्याचेही भंडारे यांनी म्हटले आहे.

विटंबना प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी- आमदार संग्राम जगताप

दरम्यान, अनवा येथे हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये मास टाकून झालेल्या विटंबना प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे यात पोलिसांनी अडकवलेल्या निर्दोष नंदकुमार वडगावकर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे विटंबना करणाऱ्या खरा आरोपीला तात्काळ पकडावे असे प्रतिपादन भोकरदन येथील आक्रोश सभेमध्ये बोलताना अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केले.

हिंदू धर्मावर सध्या सर्व बाजूंनी मोठे संकटे- सुदर्शन महाराज

यावेळी महानुभाव पंथाचे मुनिश्री सुदर्शन महाराज यांनी सांगितले की, नंदकिशोर वडगावकर हे पंथाचे अनुयायी असून ते असला कुठलाही प्रकार करू शकत नाही. केवळ त्यांना चुकीच्या माहितीवरून पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले असून त्यांच्यावरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. हिंदू धर्मावर सध्या सर्व बाजूंनी मोठे संकटे येत आहे. हिंदू धर्माचे संघटन हे महत्त्वाचे आहे. सर्व पंथ जातीभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे व सर्वांनी जागृत राहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments