शनिशिंगणापूर देवस्थानसाठी कार्यकारी समिती स्थापन, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


अहिल्यानगर - शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करून राज्य सरकारने प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली आहे. आता जिल्हाधिकारी यांनी ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये फक्त सरकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ११ अधिकाऱयांची ही समिती आहे.

या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अतुल चोरमारे (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिरादार (तहसिलदार, नेवासा), मुख्य लेखाधिकारी तथा सदस्य गणेश खेडकर (लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर), उप मुख्य लेखाधिकारी तथा सदस्य राजकुमार पुंड (उपकोषागार अधिकारी, नेवासा), व्यवस्थापक तथा सदस्य सचिव राजेंद्र वाकचौरे (नायब तहसीलदार, नेवासा), उप व्यवस्थापक तथा सदस्य विनायक गोरे (मंडळाधिकारी, घोडेगाव), सदस्य - संजय लखवाल (गट विकास अधिकारी नेवासा), आशिष शेळके (सहायक पोलीस निरीक्षक, शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन), विनायक पाटील (उपअभियंता सा.बां. नेवासा), सतिष पवार (तलाठी, शिंगणापूर), दादासाहेब बोरुडे (ग्रामसेवक, शिंगणापूर) यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments