श्रीनगरमधील राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगरचा झेंडा‎


 

अहिल्यानगर - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये अहिल्यानगरचा झेंडा फडकला आहे. नगर पोलीस दलातील मनीषा निमोणकरांनी कांस्यपदक तर कोमल शिंदेंनी रौप्यपदक पटकावले. काश्मीरवरून परतल्यानंतर मंगळवारी मुंबईतील पोलीस मुख्यालयात एडीजे कृष्णप्रकाश यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी एडीजे मधुकर पांडे, आयजी त्रिमुखे आदींसह महाराष्ट्रातून ११ पदक प्राप्त खेळाडू उपस्थित होते.

पिंच्याक सिलॅट (बॉक्सिंग, कुस्ती, कराटे) या क्रीडा प्रकारात ८० किलो वजन गटात पोलीस मुख्यालयातील मनीषा निमोनकरने दिल्लीच्या पोलीस खेळाडूचा पराभव केला. यात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक मिळवले. तोफखाना पोलीस स्टेशनच्या कोमल शिंदे या खेळाडूने ८५ किलो वजन गटात पंजाबच्या एसएसबीच्या खेळाडूचा पराभव करत द्वितीय क्रमांकाच्या रौप्यपदकाची कमाई केली.

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात या दोघी १५ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आरपीआय परदेशी, स्पोर्ट इन्चार्ज व्हिक्टर जोसेफ यांचे मार्गदर्शन लाभले. नगर जिल्ह्यातून फक्त या दोघींनाच पदके मिळाली आहे. महाराष्ट्रातून एकूण ८५ खेळाडू गेले होते. त्यामध्ये ११ जणांना पदके मिळाली आहेत.

आंतरजिल्हा सामने नगर शहरात झाल्यानंतर नाशिक येथे विभागीय सामने झाले. त्यानंतर ठाणे येथे राज्यपातळीवरील सामने झाले. याठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत नगर पोलीस दलातील या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले होते. काश्मीरमध्ये झालेल्या या ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेत पदक मिळाल्याबद्दल दोघींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली दोन पदके या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ८५ खेळाडू सहभागी झाले होते. यातील ११ खेळाडूंना पदक मिळण्यात यश मिळाले. या ११ पदकांत दोन पदके नगर जिल्ह्याला मिळाली आहेत. आंतरजिल्हा सामने नगरमध्ये झाल्यानंतर नाशिक येथे विभागीय सामने पार पडले होते.

0/Post a Comment/Comments