अहिल्यानगर - शहराच्या उपनगरी भागात तपोवन रोडवरील ढवण वस्ती परिसरात कराळे मळ्यात आढळलेल्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला तिने हुलकावणी दिली आहे.सदर मादी रात्रभर त्या पिंजऱ्या भोवती घिरट्या घालत होती, मात्र ती पिंजऱ्याच्या आत काही गेली नाही. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिने तेथून पळ काढला. त्यामुळे वनविभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
तपोवन रस्त्यालगत असलेल्या कराळे यांच्या शेतात मागील चार दिवसांपासून ऊसाची तोड सुरू असताना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिलांच्या आवाजाने मजुरांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी तीन पिले दिसून आली. त्यामुळे तातडीने ऊसतोड थांबवून सगळे बाजुला झाले. त्यावेळी मादी धावून येत गुरगुरली होती. या मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला. त्या पिंजऱ्यात पिले ठेवली. त्या पिलांच्या आशेने तरी मादी पिंजऱ्यात जेरबंद होईल असा वनविभागाचा कयास होता.
सायंकाळ पासून वनविभागाच्या पथकाने थर्मल ड्रोनने टेहळणी सुरू सुरु केली. रात्रभर हे पथक पिंजऱ्यावर ड्रोनने लक्ष ठेवून होते. मात्र मादी रात्रभर पिंजऱ्या भोवती घिरट्या घालत राहिली पण पिंजऱ्याच्या आत काही गेली नाही. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिने तेथून पळ काढला. त्यामुळे वनविभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक विजय चेमटे, चालक संदीप ठोंबरे, वन्य जीव अभ्यासक हर्षद कटारिया यांचा समावेश होता.
.jpg)
Post a Comment