नगर - नगर दौंड महामार्गाच्या साईडपट्टी वरून पायी चाललेल्या व्यक्तीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने त्या व्यक्तीच्या अंगावरून मालट्रकचे चाक गेले. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिखली (ता.श्रीगोंदा) शिवारात हॉटेल राजवीर समोर रविवारी (१६ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी घडली.
प्रदीप पोपट कासार (वय ४१, रा. चिखली ता.श्रीगोंदा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत प्रदीप कासार हे रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास नगर कडून चिखली गावाकडे घरी रस्त्याच्या कच्च्या साईड पट्टी वरून पायी जात होते. त्यावेळी नगरकडून दौंड च्या दिशेने भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या मालट्रक ने त्यांना धडक दिली. या धडकेत ते खाली पडले व त्यांच्या अंगावरून मालट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी संभाजी रामदास साबळे (रा. कोरेगाव,ता.श्रीगोंदा) यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी ट्रक चालक राजेश नारायण राठोड (रा.किला खंडारा, मध्य प्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment