'आप्पी आमची कलेक्टर' फेम शिवानी नाईक झाली अहिल्यानगरची सून, थाटात झाला साखरपुडा



मुंबई - झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर मधली अपर्णा सुरेश माने म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. ती स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते फेम मकरंद किल्लेदार म्हणजेच अभिनेता अमित रेखीसोबत लग्न करणार आहे. अभिनेता अमित हा अहिल्यानगर शहरातील रहिवासी आहे. रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. ही बातमी अचानक समोर आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र नंतर सगळ्यांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले.

शिवानी आणि अमित यांच्या साखरपुड्याला इंडस्ट्री मधल्या अनेक मित्रमंडळींनी उपस्थिती लावलेली. निवेदिता सराफ यांनी अमित सोबत दोन मालिकांमध्ये काम केल्यामुळे त्या सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या. शिवानीने ज्याच्याशी साखरपुडा केला, तो अमित रेखी सुद्धा मराठी मालिकांमधील अभिनेता आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ यात त्याने मकरंदची भूमिका साकारली आहे. शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अमित रेखी असं आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर रविवारी त्यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती होती.अमित रेखीने ‘भाग्य दिले तू मला’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिवानी आणि अमित यांनी काही नाटकांमध्ये एकत्र काम केलंय. तिथूनच त्यांच्याच चांगली मैत्री झाली.अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी जेव्हा शिवानी नाईकची निवड झाली होती, तेव्हा अमितने तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. या दोघांवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमात सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे साईराज केंद्रेने. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये साईराज ने अमोल हे पात्र साकारलेले. अमोल म्हणजेच अप्पी आणि अर्जुन चा मुलगा असतो. खरे तर दोन वर्षांपूर्वी साईराजची एक रील प्रचंड व्हायरल झालेली. ज्यामध्ये तो आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर अभिनय करताना दिसलेला. त्याची निरागसता सोशल मीडिया युजर्सना प्रचंड आवडली. मग त्याच्या कामाची दखल घेत त्याला झी मराठीवरील वज्र प्रोडक्शनने अप्पी आमची कलेक्टर मालिकेमध्ये काम देऊ केले. या मालिकेमध्ये सुद्धा त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अप्पी आणि अमोलचा बॉंड प्रेक्षकांना भरपूर आवडायचा. ऑफ स्क्रीन सुद्धा या दोघांचं मायलेकासारखं नातं होतं.

काल शिवानी च्या साखरपुड्यात सुद्धा साईराज ने उपस्थिती लावलेली. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.यामध्ये शिवानी नाईक आणि अमित रेखी साखरपुड्याचे विधी पार पाडत असताना साईराज कौतुकाने आपल्या अप्पी मॉं चे फोटो काढताना दिसला. किंबहुना शिवानी सुद्धा आजूबाजूला एवढा गजबजाट असून सुद्धा साईराज कडे लक्ष देत होती. या दोघांचा हा व्हिडिओ युजर्सना खूप आवडला असेल दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments