धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची धावत्या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या




अकोला - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुख वैभव घुगे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील जुन्या आरटीओ रोडवरील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वैभव घुगे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता होता. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. 

या घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. मात्र, वैभव घुगेंनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या  केली असल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती आहे. वैभव घुगेंच्या आत्महत्येने अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे, पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या समोर आत्महत्येचं खरं कारण शोधण्याचं मोठं आव्हान आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या ट्रेनसमोर उडी मारत वैभव घुगे यांनी आयुष्य संपवलं. हा पदाधिकारी आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता होता अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुखाने आत्महत्या केली. वैभव घुगे असे आत्महत्या केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव होते. अकोल्यातील जुन्या आरटीओ रोडवरील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली, या निर्णयामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव घुगेंनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. वैभव घुगेंच्या आत्महत्येने अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. वैभव घुगे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुंटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांच्या समोर या आत्महत्येमागचं खरं कारण शोधण्याचे मोठं आव्हान असणार आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments