अहिल्यानगर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका उरकण्यात येणार आहे. त्यानुसार
राज्यातील पालिका निवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट, गणाची प्रभाग रचना
झाल्यानंतर मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आता येत्या 24 नोव्हेंबरला गट आणि
गणातील मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती
निवडणूक विभागाच्या सुत्रांनी दिली.
नगर
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 75 आणि
पंचायत समितीच्या 150 गणांसाठी
लवकरच निवडणूकांची घोषणा होणार आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकीसाठी आचारसंहिला
लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या सर्वत्र राज्य सरकारकडून विकास कामांच्या
शुभारंभाचा धाडका सुरू असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या
निवडणूका लागू झाल्यास निवडणूक, तसेच
पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रम यात दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे.
याचा परिणाम विकास कामे आणि मंजूरी निधी खर्च करण्यावर होवू नयेत, यासाठी सध्या जिल्हा
प्रशासनसह जिल्हा परिषद प्रशासन, आमदार
यांच्यावतीने विकास कामांचा शुभारंभ सुरू असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीच्या
तोंडावर सध्या मंजूर विकासचे आकडे उधळण्यात सर्वजण दंग दिसत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद
निवडणुकीसाठी ग्रामीण भागात 30 लाखांहून
अधिक मतदार असून या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरू असल्याचे
दिसत आहे. दरम्यान, स्थानिक
स्वराज्यच्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्यांत गट आणि गणांची रचना जाहीर करण्यात
आली. त्यानंतर प्रारू मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. बिहार निवडणुकीत दुबार
मतदारांचा विषय चर्चेत आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील
विधानसभा मतदारयादीनूसार अशी नावे तपासण्यात आली. नगर जिल्ह्यात अवघी 1 हजार 500 मतदरांची नावे झेडपी, पंचायत समितीच्या
निवडणूक यादीत दिसून आलेली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी 12
नाव्हेंबरला
गट आणि गणातील केंद्रनिहाय मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक अडचण
आल्याने आता ही यादी येत्या 24 नाव्हेंबरला
प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वीच जिल्हा परिषद आणि
पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार असल्याचा अंदाज आहे.
येणार्या आठवड्यात कधीही जिल्हा परिषद आणि
पंचायत समित्याच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदांच्या
निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून या निवडणूका जाहीर झाल्यानंतर खर्याअर्थाने
ग्रामीण भागात रंगत वाढणार आहे. 2017 ला
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती. ही मुदत 2022 ला
संपल्यानंतर तेव्हापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक राज सुरू आहे.

Post a Comment