आयटी फर्म मॅनेजर महिलेवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार



नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजस्थानातील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या व्यवस्थापकावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), एक महिला कार्यकारी प्रमुख आणि तिचा पती अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 20 डिसेंबर रोजी घडली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडिता रात्री 9 वाजता पार्टीला पोहोचली. पार्टी रात्री 1.30 पर्यंत चालली आणि उपस्थितांसह पीडिताही मद्यधुंद होती. पार्टीनंतर कारमधून घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला कंपनीच्या महिला कार्यकारी प्रमुखाने कारमध्ये घेतले. प्रवासादरम्यान सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीने एका दुकानातून सिगारेटसारखा दिसणारा पदार्थ खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली. ते पीडितेलाही दिले. ते सेवन केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे दुसर्‍या दिवशी सकाळी पीडितेच्या लक्षात आले.
दाखल झालेल्या एफआयआरमध्ये, पीडिता एक खासगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होती. २० डिसेंबर रोजी कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन शोभागपुरा येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. पीडिता या पार्टीत रात्री ९ वाजेपर्यंत पोहचली होती.
ही पार्टी रात्री १.३० मिनिटांपर्यंत चालली होती. पार्टीचा कार्यक्रम औपचारिकरित्या संपला. पार्टीत कंपनीच्या सीईओसोबत महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती देखील उपस्थित होते. पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, पार्टीवेळी तिची तब्येत बिघडत होती. ती बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होती. त्याचवेळी काही लोकांनी तिला घरी सोडण्याची ऑफर देण्याची आली. मात्र महिला एक्झिक्युटिव्ह हेडने जिला ऑफ्टर पार्टीचा प्रस्ताव दिला.

स्मोकिंगची सामुग्री खरेदी केली अन्...

एफआयआरमध्ये नमुद करण्यात आल्याप्रमाणे रात्री जवळपास १.४५ मिनिटांनी पीडित महिलेला गाडीत बसवण्यात आलं. या गाडीत सीईओ आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आधीपासूनच उपस्थित होते. या तिघांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिलं. रस्त्यात त्यांनी दुकानातून स्मोकिंगची सामुग्री खरेदी केली. पीडित महिलेला देखील स्मोक करण्यासाठी सांगण्यात आलं.

मात्र स्मोकिंगनंतर त्या महिलेची तब्येत जास्तच बिघडली. ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. काही वेळानं तिला शुद्ध आली त्यावेळी तिने सीईओ तिच्यासोबत असभ्य वर्तन करत होता असा आरोप केला. महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिच्या पतीने मिळून तिच्यासोबत वाईट कृत्य केलं. पीडितेने सांगितल्याप्रमाणे ती स्वतःला वाचवण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी सतत याचना करत होती. मात्र आरोपींनी तिचे ऐकले नाही अन् तिच्यावर बलात्कार केला.

सकाळपर्यंत सुरू होता प्रकार

पीडितेने पोलिसांना सांगितले की, जवळ जवळ पहाटे ५ वाजता तिला तिच्या घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर ती पूर्णपणे नॉर्मल नव्हती. ज्यावेळी तिला शुद्ध आली त्यावेळी तिला तिचे एक इयरिंग, सॉक्स आणि अंडरगार्मेंट गायब होता. तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखम देखील झाली होती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ती खचली होती. त्यानंतर तिनं हिम्मत करून पोलीस ठाणे गाठले.


 

0/Post a Comment/Comments