अहिल्यानगर - हातात गावठी कटटा, कोयते घेवुन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्या कडून एक गावठी कटटा, जिवंत काडतुस व ३ कोयते जप्त करण्यात आले आहेत. १४ जानेवारीला वडगाव गुप्ता शिवारात दत्तनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसीचे स.पो.नि. माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम हे हातात गावठी कटटा, लोखंडी कोयते घेवुन दत्तनगर वडगाव गुप्ता शिवारात दहशत करुन फिरत आहेत ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकाला कारवाईसाठी पाठविले. पथक सदर ठिकाणी गेले असता तेथे चार ते पाच इसम हे हातात लोखंडी कोयते घेवुन फिरातांना दिसले. पोलीस त्यांचे दिशेने जावु लागले असता त्यांना पोलीसांचा संशय आल्याने ते पळुन जावुन लागले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले.
यामध्ये हर्षद गौतम गायकवाड (वय २१, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता, ता.नगर), वैभव गौतम गायकवाड (वय १९, रा. वरवंडी, ता. राहुरी, हल्ली रा.दुध डेअरी चौक, वडगाव गुप्ता, ता. नगर), भुषण चंद्रकात गाढवे (वय २२, रा चांदा, ता. नेवासा, हल्ली रा. इंजिनिअरींग कॉलेजजवळ विळद घाट),मनजित मदनलाल किसाना (वय २४, रा.दुघ डेअरी चौक, नवनागापुर), स्वप्निल व्यंकटेश म्हेत्रे (वय २१ रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता, ता.नगर) यांचा समावेश आहे. पकडलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता हर्षद गौतम गायकवाड याचे कमरेला एक गावठी कटटा व त्यामध्ये एक जिवंत काडतुस मिळून आले. वैभव गौतम गायकवाड, भुषण चंद्रकांत गाढवे व स्वप्निल व्यंकटेश म्हेत्रे यांचे हातात तीन लोखंडी कोयते मिळून आले. सदर गावठी कटटा व लोखंडी कोयते जप्त केले असुन त्यांचे विरुध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई स.पो.नि. माणिक बी. चौधरी यांचे मार्गदर्शानाखाली स.फौ. राकेश खेडकर, पो.हे.कॉ. संदीप पवार, पो.हे.कॉ. राजु सुद्रीक, पो.हे.कॉ आडबल, पो.हे.कॉ. टेमकर, पो.कॉ.किशोर जाधव, पो.कॉ. नवनाथ दहिफळे, पो.कॉ.ज्ञानेश्वर आघाव, पो.कॉ.अक्षय रोहोकले यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment