‘एमडी’ हे अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तरुणाला नगर – दौंड रोडवर पकडले

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - नशेसाठी वापरले जाणारे मेफेड्रॉन (एमडी) हा अंमलीपदार्थ जवळ बाळगणाऱ्या तरुणाला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. १४ जानेवारी रोजी नगर दौंड रोड वर अरणगाव बायपास चौकात ही कारवाई करण्यात आली आहे. शाहरुख अस्लम शेख (वय ३०, रा. शितल कॉलनी, पठाण चाळ, आयेशा मस्जिद समोर मुकुंदनगर) असे या तरुणाचे नाव आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांचे पथक हे नगर दौंड रोड वर अरणगाव बायपास चौकात १४ जानेवारीला नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी तेथून चाललेल्या शाहरुख शेख याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या खिशात नशेसाठी वापरले जाणारे मेफेड्रॉन (एमडी) हा अंमलीपदार्थ आढळून आला

त्याचे वजन १.६३० ग्रॅम भरले. त्याची किंमत ३ हजार ६२० रुपये एवढी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध स.फौ. शकील सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (), २२, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. प्रल्हाद गिते हे करत असून आरोपीने हे अंमलीपदार्थ कुठून आणले याचा शोध घेत आहेत.  


 

0/Post a Comment/Comments