पारनेर - आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) वर उत्कृष्ट काम, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूती तसेच सर्वाधिक कुटुंबनियोजन शस्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या बद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकवाडी (ता. पारनेर) येथील वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ ऐश्वर्या होनमोरे -शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) सौ.मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने शासनाच्या आरोग्यविषयक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचविणाऱ्या आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील ३४ जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकवाडी (ता. पारनेर) येथील वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ ऐश्वर्या होनमोरे - शिंदे यांना हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व सहकारी स्टाप यांनी केलेल्या सहकार्यामुळे घेतलेल्या मेहनतीमुळे हा सन्मान मिळाला असून शासनाच्या आरोग्य विभागाचा खेड्यापाड्या तील गोरगरीब नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा जो उद्देश आहे. तो सफल करण्यासाठी यापुढेही कार्यरत राहू असे वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ ऐश्वर्या होनमोरे –शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा ...
शिवसेना शिंदेगट आणि भाजपचं बिनसलं, सभागृहात जोरदार राडा
भाजपच्या बेपत्ता नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ

Post a Comment